जम्मू/भदरवाह – जम्मू आणि काश्मीरच्या राज्य तपास संस्थेने दहशतवादाला वित्तपुरवठा केल्याच्या प्रकरणात आज एकूण 12 ठिकाणी छापे टाकले. या प्रकरणी गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर सखोल तपासासाठी एसआयएकडे वर्ग करण्यात आला, असे संबंधीत अधिकाऱ्यांनी सांगितले.
जम्मू, कठुआ, डोडा आणि काश्मीरमध्ये हे छापे टाकले गेले. भदरवाहच्या मस्जिद मोहल्ला परिसरातील एका घरावरही छापा टाकला.एका वृत्तानुसार मस्जिद मोहल्ला परिसरातील झुबेर खतीब यांच्या घरावर हा छापा टाकला गेला. जुबेरचे वडील हुसेन खतीब हे 20 वर्षांहून अधिक काळ पाकिस्तानात आहेत.
खतीब हे प्रतिबंधित दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित आहेत.तेथे काही महत्वाच्या वस्तु जप्त करण्यात आल्या आहेत असे सांगण्यात येते.