नवी दिल्ली – दिल्लीतील मुंडका येथे लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत 27 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अनेक लोक अद्याप बेपत्ता आहेत. या दुर्घटनेतून काही लोक बचावले आहेत. मृत्यूच्या मुखातून बाहेर आले आहेत. 18 वर्षीय तनू देखील त्यापैकी एक आहे. या इमारतीतून ती कशी बाहेर पडली या संपूर्ण घटनेची कहाणी तिने सांगितली आहे.
ज्या इमारतीत दुर्घटना घडली तेथील कंपनीत तनू 1 वर्षापासून काम करते. या दुर्घटनेत तिच्या दोन्ही हातांना दुखापत झाली आहे. तिने सांगितले की ती दुसऱ्या मजल्यावर होती. कर्मचाऱ्यांची बैठक सुरु होती. बाहेर काय झाले ते कोणालाच कळले नाही. बाहेर पडण्याचा एकच मार्ग होता. प्रथम दरवाजा तोडण्याचा खूप प्रयत्न केला, खूप प्रयत्न केल्यानंतर दरवाजा तोडण्यात आला, मात्र त्यानंतरही ते तेथून बाहेर पडू शकले नाही. मग मॅनेजरच्या केबिनमधील खिडकीची काच फोडून सर्वजण बाहेर पडले. दुसऱ्या मजल्यावरचे शटर वर केले, त्यानंतर दोरीच्या साहाय्याने तेथून खाली आले. या संपूर्ण इमारतीत 250 लोक होते. आम्ही दीड तास तिथेच अडकलो होतो. तिथे आम्हाला श्वासही घेता येत नव्हता. आम्हाला कसेतरी इमारतीतून बाहेर पडायचे होते.
तनूने सांगितले की, या दुर्घटनेत त्यांच्या बॉसच्या वडिलांचा मृत्यू झाला. ते देखील त्या बैठकीला हजर होते. ते खूप वयस्कर असल्याने त्यांना चालता येत न्हवते. अग्निशमन दलाची गाडी उशिरा पोहोचली. आम्ही तिथून निघून गेल्यावरही तिथे बरेच लोक अडकले होते. त्यात बहुतांश महिला होत्या. एक्झिट गेटवर कोणतीही अग्निशामक यंत्रणा बसवण्यात आली नसल्याचे तनूने सांगितले.