नवी दिल्ली – सीबीआयने शुक्रवारी बीएसएनएलच्या माजी महाव्यवस्थापकासह 21 अधिकाऱ्यांविरुद्ध छापेमारी करीत त्यांच्या विरोधात गुन्हे नोंदवले आहेत. तसेच सीबीआयने त्यांच्या तब्बल 25 ठिकाणांवर छापे घातले आहेत. या अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांबरोबर संगनमत करून भारत संचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) फसवणूक केल्याचा आरोप आहे.
छापा टाकण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये आसाम सर्कलचे माजी महाव्यवस्थापक, आणि मुख्य लेखा अधिकारी यांचा समावेश आहे.ऑप्टिकल फायबर नेटवर्कसाठी केबल टाकण्याच्या कामात अनेक ठिकाणी मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत होता त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे. या भ्रष्टाचारामुळे बीएसएनएलचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, आणि हरियाणा या राज्यातही असे छापे घालण्यात आले आहेत.