नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी ‘मोदी आडनाव’ बदनामी प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केली आहे. त्यामुळे या याचिकेवर आता सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची 21 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. गुजरातमधील खालच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी यापूर्वी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यांनी निकाल कायम ठेवला होता.
[BREAKING] Remark on Modi surname: Supreme Court agrees to hear on July 21 Rahul Gandhi’s appeal seeking stay on conviction in defamation case
report by @DebayonRoy #RahulGandhi #SupremeCourt @RahulGandhi https://t.co/rZBGfaNkr7
— Bar & Bench (@barandbench) July 18, 2023
दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने 21 जुलै रोजी सुनावणी घेण्याचे मंगळवारी मान्य केले. राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे.
गुजरात न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांच्या दोन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला स्थगित करण्यास नकार दिला होता. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी या प्रकरणाचा उल्लेख करून लवकर सुनावणी घेण्याची मागणी केल्यानंतर भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी गांधींच्या अपीलावर सुनावणीची तारीख निश्चित केली.त्यानुसार आता या प्रकरणाची सुनावणी २१ जुलै रोजी करण्यात येणार आहे.