Stock Market Crash । इस्रायलने प्रत्युत्तर देत इराणवर क्षेपणास्त्राने हल्ला केल्याने इथे युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशाच्या तणावाचा परिणाम आज शेअर बाजारातही दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. सुरुवातीच्या व्यवहारातच शेअर बाजार कोसळला. सेन्सेक्स आज 489 अंकांनी घसरून 71,999.65 वर उघडला आणि जवळपास 600 अंकांनी घसरून व्यवहार करत आहे. तर निफ्टी 200 अंकांनी घसरून 21,788.25 वर व्यवहार करत आहे.
बीएसई सेन्सेक्सच्या सर्व शीर्ष 30 समभागांपैकी, आयटीसी आणि टायटनचे समभाग तेजीत होते, परंतु उर्वरित 28 समभाग घसरले आहेत. इफोसिसमध्ये सुमारे दोन टक्क्यांची घट झाली आहे. याशिवाय AXIS, L&T, Nestle सारखे समभागही 1.50 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. NSE चे 1800 शेअर्स घसरत आहेत, तर 344 शेअर्स वधारत आहेत.
सर्वच क्षेत्रात मोठी घसरण Stock Market Crash ।
NSE च्या 2,214 शेअर्सपैकी 53 शेअर्समध्ये लोअर सर्किट आहे, तर 40 शेअर्समध्ये अपर सर्किट आहे. 15 समभागांनी 52 आठवड्यांचा नीचांक गाठला आहे. बँक निफ्टी आज जवळपास 300 टक्क्यांनी घसरला आहे, तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक 150 अंकांपर्यंत घसरले आहेत. याशिवाय आज निफ्टीच्या सर्व सेक्टरमध्ये मोठी घसरण झाली आहे. ऑटो ते आयटी, हेल्थकेअर आणि ऑइलपर्यंत 1 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.
कोणत्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली? Stock Market Crash ।
सर्वात मोठ्या घसरलेल्या समभागांबद्दल बोलायचे झाल्यास, NBCC इंडिया 3 टक्के, टाटा कम्युनिकेशन सुमारे 5 टक्के, Nykaa 3 टक्के, HPCL सुमारे 3 टक्के, BPCL 3.39 टक्के, कॅनरा बँक 2.89 टक्के आणि ICICI प्रुडेन्शियल 3.72 टक्क्यांनी घसरले आहेत. .
शेअर बाजारातील घसरणीची तीन मोठी कारणे
बाजार उघडण्यापूर्वी इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने सांगितले की, इस्रायलने शुक्रवारी पहाटे इराणच्या इस्फहान शहरातील विमानतळावर क्षेपणास्त्राने हल्ला केला. अशा स्थितीत शेअर बाजार उघडला तेव्हा मोठी घसरण पाहायला मिळाली. इस्रायलच्या हल्ल्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीही घसरल्या आहेत.
दुसरे मोठे कारण म्हणजे गुरुवारी इन्फोसिसचा निकाल, ज्यामुळे एडीआर 8 टक्क्यांनी घसरला, त्यामुळे या मोठ्या कंपनीची विक्री झाली, त्याच वेळी, जागतिक बाजारातही गेल्या आठवड्यापासून घसरण सुरूच आहे. याशिवाय सेन्सेक्सची मुदत संपल्यामुळे आज विक्रीचा जोर आहे.