Lok Sabha Election 2024 । आज लोकसभा निवडणूक 2024 चा पहिला टप्पा आहे. या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांवर मतदान होणार आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू होणार असून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे. आज अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभेच्या ९२ जागांवरही मतदान होणार आहे. अशात पश्चिम बंगालमध्ये धक्कादायक घटना घडली आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील माथाभंगा येथे निवडणूक कर्तव्यात गुंतलेल्या सीआरपीएफ जवानाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आढावा घेतला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.
Lok Sabha Election 2024 । पोलीस काय म्हणाले…
‘शिपाई बाथरूममध्ये पडला होता, त्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला. ही घटना काल रात्री घडली. माथाभंगा येथील मतदान केंद्राच्या बाथरूममध्ये सीआरपीएफ जवान बेशुद्धावस्थेत आढळून आला. लोकांनी पाहिल्यावर शिपायाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या जवानाच्या डोक्याला दुखापत झाल्याचे रुग्णालयातील सूत्रांचे म्हणणे आहे.’
जवान बाथरुममध्ये पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. कोणत्याही अनियमिततेबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
पश्चिम बंगालच्या या जागांवर मतदान होत आहे
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज शुक्रवारी होत आहे. पहिल्या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांवर मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात अनेक केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्रीही रिंगणात आहेत. मतदानाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर, 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश असतील जिथे निवडणुका संपतील. पश्चिम बंगालमधील कूचबिहार, अलीपुरद्वार आणि जलपाईगुडी या तीन जागांवरही मतदान होत आहे.
हे वाचाल का ?
लोकसभेसाठी महाराष्ट्रातही आज मतदान ; नक्षलग्रस्त भागात ३ वाजेपर्यंतच मतदान