Rahul Gandhi : विधानसभा निवडणूकीच्या विजयानंतर भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ मध्ये मतदारांनी बीजेपीच्या बाजूनं कौल दिला आहे. या राज्यांमध्ये बीजेपीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे दिसून आले आहे. कॉग्रेसचे राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांच्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी परखड शब्दांत टीका केल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, अश्यातच आता आजच्या निकालावर कॉंग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. “जनतेचा कौल विन्रमपणे स्वीकारतो..’ असं राहुल गांधी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये म्हंटलं आहे.
तीन राज्यांत कॉंग्रेसचा पराभव झाल्याने त्यावर प्रतिक्रीया देताना राहुल गांधी यांनी म्हटले आहे की “या राज्यांतील जनतेने दिलेला कौल आम्ही विन्रमपणे स्वीकारतो. पण आम्ही आमची विचारांची लढाई सुरूच ठेवणार आहोत असे त्यांनी म्हटले आहे.
मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ और राजस्थान का जनादेश हम विनम्रतापूर्वक स्वीकार करते हैं – विचारधारा की लड़ाई जारी रहेगी।
तेलंगाना के लोगों को मेरा बहुत धन्यवाद – प्रजालु तेलंगाना बनाने का वादा हम ज़रूर पूरा करेंगे।
सभी कार्यकर्ताओं को उनकी मेहनत और समर्थन के लिए दिल से शुक्रिया।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 3, 2023
त्यांनी तेलंगणा निवडणुकीत जनतेने दिलेल्या यशाबद्दल त्यांनी तेथील जनतेचेही आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, तेथील जनतेला दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहु. प्रजालू तेलंगणा बनवण्याचे आश्वासन आम्ही पुर्ण करू असेही त्यांनी म्हटले आहे.
या निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दलही त्यांनी आभार मानले आहेत. या चारही राज्यांच्या निवडणूक प्रचारात राहुल गांधी यांच्या बरोबरच प्रियंका गांधी यांनीही जोरदार प्रचार केला होता.