मुंबई – लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाच राज्यांच्या विधानसभा निकालांकडे पाहिलं जात होत. आज चार राज्यांचे निकाल लागले. यानुसार छत्तीसगढ,मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपचं सरकार येणार आहे यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. तर तेलंगणामध्ये बीआरएसचं सरकार जाऊन काँग्रेसची सत्ता आली आहे. आज लागलेल्या चार राज्यांच्या निकालामध्ये टाऊन राज्यांमध्ये भाजप तर एका राज्यामध्ये काँग्रेस विजयी झालं आहे. देशभरातून पुन्हा एकदा मोदींवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.बॉलिवूडमधून देखील आता भाजपच्या विजयाबाबत प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. अभिनेत्री कंगना राणावतने (Kangana Ranaut) ट्विट करत पंतप्रधान मोदींसह भाजपचे कौतुक केले आहे. (4 state election result)
तीन राज्यांमध्ये भाजपच्या विजयाचा आनंद साजरा करताना कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो शेअर केला आहे. फोटोसोबत तिने ‘राम आये है असं लिहिले आहे.’ यासोबतच अभिनेत्रीने निवडणूक निकालांचा हॅशटॅगही वापरला आहे. तिच्या पोस्टवर कमेंट करत एका युजरने टिप्पणी केली, ‘तू पीएम मोदींची हिंदू देवाशी तुलना करत आहे… हिंदू धर्मात याची परवानगी आहे का?’ (PM modi)
कंगनाने नेटिझला प्रत्युत्तर देत लिहिले, ‘होय, परवानगी आहे. श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे की, तोच माझा खरा भक्त आहे, त्याच्यात आणि माझ्यात काही फरक नाही, आम्ही खूप प्रेमळ आणि शांतीप्रिय आहोत आमचे देवही तसेच आहेत. तुम्हीही या आमच्या टीममध्ये. कंगना पुढे म्हणाली माझ्या म्हणण्याचा अर्थ हा आहे कि, मोदीजींनी रामजींना अयोध्येत आणले, त्यामुळे जनतेने त्यांना आणले आहे, पण तुम्ही जे समजत आहात ते चुकीचे नाही. जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान मोदी येणार आहेत. असं देखील कंगना म्हणाली. (Bjp Win)
Haan allowed hai.
Geeta mein Shri Krishan ne kaha hai, jo mera bhakt hai mujhmein leen hai woh main he hoon, usmein aur mujhmein koi antar nahi, itne cute and chilled out Gods hain hamare !! Koi beheading koi whip lashing kuch nahi, aap bhi aa jao hamari team mein 😁…
Also my…— Kangana Ranaut (@KanganaTeam) December 3, 2023
निवडणुकीचे निकाल पाहून कंगनाने राहुल गांधींच्या पनौती (Panauti word) शब्दाचा देखील समाचार घेतला आहे. कंगना ट्विटमध्ये म्हणते,”जो सनातन नहीं मिटा था रावण के अहंकार से…जो सनातन नहीं डिगा था कंस की हुंकार से…जो सनातन नहीं मिटा था बाबर और औरंगजेब के अत्याचार से…वह सनातन क्या मिटेगा पप्पू पनौती के प्रयास से !”
जो सनातन नहीं मिटा था रावण के अहंकार से…
जो सनातन नहीं डिगा था कंस की हुंकार से…
जो सनातन नहीं मिटा था बाबर और औरंगजेब के अत्याचार से…
वह सनातन क्या मिटेगा पप्पू पनौती के प्रयास से !— Kangana Ranaut (@KanganaTeam) December 3, 2023
कंगना (Kangana Ranaut Upcoming movie) शेवटची एरियल अॅक्शन फिल्म ‘तेजस’ मध्ये दिसली होती. ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांनी पूर्णपणे नाकारला आणि बॉक्स ऑफिसवर तो फ्लॉप ठरला. अभिनेत्री लवकरच आणीबाणीवर आधारित चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये ती माजी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे.