नवी दिल्ली – करोना व्हायरसमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे ३६ व्या दिवशी आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
आजारी नातलग आणि आजीच्या भेटीसाठी परदेशी असणाऱ्या राहुल यांनी ट्विट करून मोदींवरील टीकेचे सत्र कायम ठेवले
यंदाच्या वर्षी 2378760000000 रूपयाचं कर्ज मोदी सरकारने काही उद्योगपतीच माफ केलं. इतक्या रक्कमेत कोव्हिड-१९ दरम्यानच्या कठिण काळात ११ कोटी कुटुंबांना २०-२० हजार रूपये देता आले असते. मोदीजीच्या विकासाचे वास्तव, अशी टीका राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे केली आहे.
2378760000000
रुपय का क़र्ज़ इस साल मोदी सरकार ने कुछ उद्योगपतियों का माफ़ किया।इस राशि से कोविड के मुश्किल समय में 11 करोड़ परिवारों को 20-20 हज़ार रुपय दिए जा सकते थे।
मोदी जी के विकास की असलियत!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 31, 2020
तर केंद्र सरकरने तीनही कृषी कायदे रद्द करून शेतकऱ्यांना नवीन वर्षाचे गिफ्ट द्यायला हवे, असा सल्लाही राहुल गांधींनी मोदी सरकारला दिला होता.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खोटे बोलण्याचा (असत्याग्रह) इतिहास लांबलचक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोदींवर विश्वास नाही, असे टीकास्त्र राहुल गांधी यांनी बुधवारी सोडले.
राहुल यांनी ट्विटरवरून एक जनमत चाचणीही शेअर केली. त्यामध्ये एक प्रश्न विचारून चार पर्याय देण्यात आले आहेत. शेतकरीविरोधी कायदे मागे घेण्यास मोदी नकार दर्शवत आहेत कारण, असा प्रश्न विचारून उत्तरासाठी चार पर्याय देण्यात आले आहेत. मोदी शेतकरीविरोधी आहेत, भांडवलदार त्यांच्याकडून काम करून घेत आहेत, ते अहंकारी आहेत किंवा तिन्हीपैकी सर्व असे पर्याय राहुल यांनी नमूद केले आहेत.