मुंबई – झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री ‘रसिका सुनील’ (rasika sunil) सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. रसिका नेहमीच आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजाने फॅन्सना घायाळ करते.
मॉर्डन ड्रेस असो किंवा पारंपरिक लूक या दोन्ही अंदाजामध्ये रसिका फारच सुंदर दिसते. मात्र नुकतंच रसिकाने जिममधील वर्कआऊट (Workout Photos) करतानाचे काही फोटो इंस्टाग्रावर शेअर केले आहे. या फोटोंमध्ये ती अतिशय हॉट अँड बोल्ड दिसत असून फॅन्सने रसिकावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
रसिका आपल्या फोटोज, व्हिडिओजच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासोबत त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यात कोणतीच कसर सोडत नाही.
शेअर केलेल्या या फोटोजमध्ये रसिका डंबेल्स हातात घेऊन वर्कआऊट करताना दिसतात आहे. या सोबतच तिने चष्मा लावून आपले ग्लॅमरस फोटोज देखील क्लिक केले आहेत.