नवी दिल्ली ( Rahul Gandhi on Sunita Reddy ) – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आंध्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष वायएस शर्मिला आणि दिवंगत काँग्रेस नेते विवेकानंद रेड्डी यांची कन्या सुनीता रेड्डी यांना देण्यात आलेल्या धमक्यांचा निषेध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की आम्ही शर्मिला आणि सुनीता यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. या महिला नेत्यांना धमकावणे हे ‘अधम आणि भ्याड कृत्य’ आहे, असे त्यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
शर्मिला आणि सुनीता यांना सोशल मिडीयातून धमक्या देण्यात आल्या असून त्यांची यात बदनामी करण्यात आली आहे. प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष वायएस शर्मिला यांनी ट्रोल्सचा उल्लेख ‘पेड’ असा केला आणि ट्रोलिंगमध्ये गुंतलेल्या व्यक्तींना ‘भ्याड’ म्हणून संबोधले आहे. | Rahul Gandhi on Sunita Reddy
त्यांनी म्हटले आहे की, फक्त भ्याड लोकच जेव्हा येऊ घातलेल्या पराभवाला सामोरे जातात तेव्हा क्रूरतेचा अवलंब करतात. त्यांची कृती दुष्ट असू शकते. परंतु आंध्र प्रदेशातील लोकांनी दाखविलेल्या समर्थन आणि आपुलकीमुळे आम्हाला शक्ती मिळते, अशी प्रतिक्रीया त्यांनी एक्सवर दिली आहे.
दरम्यान त्यांना देण्यात आलेल्या धमक्यांबद्दल पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. काँग्रेस नेते सचिन पायलट तसेच के. सी. वेणुगोपाल यांनीही एपीसीसी अध्यक्षांविरोधातील धमक्यांचा निषेध केला आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. | Rahul Gandhi on Sunita Reddy
इतर महत्वाच्या बातम्या
राजा रामाचा दरबार… अयोध्येतील राम मंदिराबाबत हवीहवीशी ‘अपडेट’
भारताचा एजंट, रशियात वास्तव्य अन् पाकिस्तानला मदत; कोण आहे सत्येंद्र सिवाल?