नवी दिल्ली – नामिबियाचे अध्यक्ष हेग गिन्गबो यांचे आज रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. अध्यक्षांच्या कार्यालयाने ही माहिती दिली आहे. अध्यक्ष गिन्गबो ८२ वर्षांचे होते आणि त्यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून कर्करोगाशी संबंधित उपचार सुरू होते. काही दिवसांनी ते उपचारांसाठी अमेरिकेला जाणार होते आणि फेब्रुवारीमध्ये नामिबियाला परतणार होते. अध्यक्षपदी गिन्गबो यांची ही दुसरी आणि अखेरची टर्म होती.
मृत्यूसमयी अध्यक्षांच्या पत्नी आणि त्यांची मुले त्यांच्या जवळ होती, असेही अध्यक्षांच्या कार्यालयाने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. अध्यक्षांच्या निधनाबद्दल काळजीवाहू उपाध्यक्ष अन्गोलो म्बुम्बा यांनीही दुःख व्यक्त केले आहे आणि जनतेला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
या क्षणी नामिबिनाने लोकांचा एक सन्माननीय सेवक, मुक्तिसंग्रामाचे प्रतीक, आपल्या राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार आणि नामिबियाचा आधारस्तंभ गमावला आहे, असे म्बुम्बा म्हणाले.देशाच्या मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीत नवीन अध्य७ंची निवड केली जाण्याची शक्यता आहे.