मुंबई – बोल्ड अभिनेत्री राधिका आपटे ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. राधिकाच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. ती सर्व प्रकारची पात्रे खूप छान साकारते. पण नुकताच राधिकाने असा खुलासा केला आहे, तिने सांगितले की, करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ती इंडस्ट्रीत बॉडी शेमिंगची शिकार झाली होती. तिला ‘तुमचं नाक चांगलं नाही, तुझे स्तन मोठे नाहीत’ हे सुरुवातीला खूप व्हायचं.’ अशा कॉमेंट्स दिल्या जात असे.
View this post on Instagram
राधिकाने अनुभव सांगितला की,’ मी एक चित्रपट गमावला, कारण माझे वजन तीन किंवा चार किलोने जास्त होते. अर्थात, जेव्हा तुम्ही नवीन असता तेव्हा ते म्हणतात, ‘तुमचं नाक चांगलं नाही, तुझे स्तन मोठे नाहीत’ हे सुरुवातीला खूप व्हायचं. मधेच काही लोक तुमच्या शरीरावर अधिकार असल्यासारखे कमेंट करायचे. आता गेल्या काही वर्षात जागरूकता आल्याने आपण याबद्दल अगदी मोकळेपणाने बोलू शकतो” असेही ती म्हणाली आहे.
37 वर्षीय राधिका आपटेने खेड्यातील मुलीपासून शहरी पात्रांपर्यंत आणि कॉमेडीपर्यंत हात आजमावला आहे. तिने मुलाखतीत सांगितले,’तिला यशस्वी व्हायचे असेल तर तिचे रूप बदलावे लागेल असे तिला कसे सांगण्यात आले होते.’ ‘माझे तीन-चार किलो वजन जास्त असल्याने मी एक चित्रपट गमावला. अर्थात, जेव्हा तुम्ही नवीन असता तेव्हा ते म्हणतात, ‘तुमचे नाक नीट नाही? तुम्ही तुमचे स्तन का मोठे करत नाही? सुरुवातीला मला सांगण्यात आले.
राधिकाचा वर्कफ्रंट बाबत सांगायचं झाल्यास, Zee5 च्या मिसेस अंडरकव्हरमध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये ती एका गृहिणीची भूमिका साकारत आहे, जी एक गुप्त गुप्तहेर देखील आहे. या कॉमेडी-थ्रिलरचे दिग्दर्शन अनुश्री मेहता यांनी केले आहे. यात सुमित व्यास आणि राजेश शर्मा यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 14 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.