मुंबई – झोया अख्तर आणि रीमा कागतीची मालिका ‘मेड इन हेवन सीझन 2’ बुधवारपासून प्राइम व्हिडिओवर पाहिली जात आहे. शोभिता धुलिपाला आणि अर्जुन माथूर नव्या सीझनमध्ये भव्य विवाहसोहळा घेऊन परतले आहे. त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाचे प्रदर्शन करण्याव्यतिरिक्त, लग्नाचा हा सीझन विविध कथांमधून जात आहे. नीरज घायवान दिग्दर्शित एका एपिसोडमध्ये राधिका आपटे दलित वधूच्या भूमिकेत दिसून येत आहे. त्यांचा दलित विवाह लोकांचे लक्ष वेधून घेत आहे आणि अनेकजण या एपिसोडला सीझनमधील सर्वोत्तम एपिसोड म्हणून संबोधत आहे.
“Made in Heaven” pic.twitter.com/kbdysG9gIg
— The Dalit Voice (@ambedkariteIND) August 15, 2023
यावरून आता सोशल चांगलीच चर्चा रंगली आहे. अशात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वेबस सिरीज आणि पल्लवीचं कौतुक केल आहे. ट्विटमध्ये ‘मला दलित स्त्री पात्र पल्लवीची जिद्द, अवहेलना आणि प्रतिकार आवडला. ज्या वंचित आणि बहुजनांनी ही सिरीज पाहिली, त्यांनी स्वतःची ओळख आणि व्यक्तिमत्त्वावर दृढनिश्चयी राहिलं पाहिजे. तुम्ही दृढनिश्चयी राहिले तरच तुम्हाला राजकीय महत्त्व प्राप्त होईल.’, असे आंबेडकर यांनी ट्विटमध्ये आहे. या ट्विटसोबत आंबेडकरांनी वेब सिरीजमधील एका सीनचा फोटोही शेअर केला आहे.
I absolutely loved the assertion, defiance and resistance of the Dalit woman character — Pallavi.
For those Vanchits and Bahujans who have watched the episode — Assert your identity and only then you gain political prominence. As Pallavi puts it, “Everything is about the… pic.twitter.com/i9YETwyLqc
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 14, 2023
दरम्यान, मेड इन हेवन 2 च्या पाचव्या भागाचे हेडिंग ‘द हार्ट स्किप्ड अ बीट’ आहे. यामध्ये आयव्ही लीगची वकील आणि लेखिका पल्लवी मेनके (राधिका आपटे) हिने आंतरजातीय विवाह केला आहे. पल्लवी तिच्या जातीय अस्मितेबद्दल बोलते आहे आणि तिला ‘समान’ वागणूक मिळावी असे वाटते. तिने आपल्या मंगेतराला दलित-बौद्ध विवाह करावा असे सुचवले.
उच्चवर्णीय वराच्या कुटुंबातील पारंपारिक संकल्पना समजून घेतल्यानंतर, पल्लवीने शेवटी लग्न केले. ती एक पांढरी आणि सोनेरी साडी नेसते आणि पाण्याच्या तलावातून तिच्या वराकडे जाते. दोघेही बौद्ध भिक्खूंच्या उपस्थितीत लग्न करतात. भगवान बुद्धांच्या शेजारी लावलेल्या दिवंगत दलित नेते भीमराव रामजी आंबेडकर यांच्या फोटोलाही ते प्रार्थना करतात.
झोया अख्तर आणि रीमा कागती ही मालिका करण मेहरा आणि शोभिता धुलिपाला मुख्य भूमिकेत असलेली एक संकलन मालिका आहे. तो एका वेडिंग प्लॅनरच्या भूमिकेत दिसत आहे. तिच्या ग्राहकांच्या कथा भव्य आणि महागड्या भारतीय विवाहांभोवती फिरतात. नीरज घायवान, झोया आणि रीमा व्यतिरिक्त या भागाचे दिग्दर्शन अलंकृता श्रीवास्तव आणि नित्या मेहरा यांनी केले आहे.