मुंबई – भांडण, प्रेम, द्वेष आणि स्पर्धा या सगळ्यांचं मिश्रण असलेला सर्वांचा लाडका रिएलिटी शो पुन्हा एकदा मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘बिग बॉस 14’ या रिअॅलिटी शो ची नुकतीच सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळीही चाहते या शोसाठी खूप उत्साहित आहे.
सलमान खानने दणक्यात या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. आतापर्यंत या कार्यक्रमात एजाज खान, निक्की तंबोली, रुबीना दिलैक, अभिनव शुक्ला, जैस्मिन भसीन, निशांत सिंह मलकानी, शहजाद देओल, सारा गुरपाल, जान कुमार सानू, पवित्रा पुनिया, राधे माँ आणि राहुल वैद्य यंदाचे बिग बॉसचे स्पर्धक असून या सर्वांची दणक्यात एन्ट्री झाली आहे.
गेल्या अनके दिवसांपासून बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये कोणते कलाकार झळकणार? याबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती म्हणजे, सुखविंदर कौर अर्थातच ‘राधे माँ’ यांची. प्रत्येक आठवड्यात राधे माँला 75 लाख रुपये दिले जाण्याचा दावा केला जात आहे.