मुंबई: राधाकृष्ण विखे पाटील यांचा उमेदवारी अर्जावरील काँग्रेसने आक्षेप फेटाळत निवडणूक निर्णय अधिकारी गोविंज शिंदे यांनी विखे पाटील यांचा अर्ज मंजूर केला.
शिर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपाकडून माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील निवडणूक लढवत आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी (4 ऑक्टोबर) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तसेच त्यांनी अर्जामध्ये स्वतःसह अन्य प्रतिनिधींचे 3 असे एकुण 4 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राधाकृष्ण विखेंनी ज्या वकिलाकडून प्रतिज्ञापत्र तयार केले. त्या वकिलाला प्रतिज्ञापत्र करण्याचा अधिकारच नसल्याचा दावा काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी केला होता. त्यामुळे संबंधित प्रकाराबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. त्यानंतर आज निवडणुक अधिकाऱ्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचा अर्ज वैध ठरवला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना नोटरी करून दिलेल्या प्रमाणपत्रावरच काँग्रेसने आक्षेप घेतला होता. ज्या वकिलांकडे हे प्रमाणपत्र बनवण्यात आलं, त्यांचा नोटरी करण्याचा परवाना 2016 मध्येच संपला असल्याचा दावा काँग्रेसने केला होता.