पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचें अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी जागाच मिळू नये अशी व्ह्यूहरचना विरोधकांनी केली आहे. त्यामुळे टिळक चौकात परवानगी देण्याची मागणी मनसेने केली आहे. याबाबत त्यांनी पोलीस आयुक्तांकडे अर्ज केला आहे.
बुधवारी राज ठाकरे हे पुण्यात प्रचार सभा घेणार आहेत. मात्र प्रशासन अडमुठ्या भूमिकेमुळे सभेची जागा मिळवण्यात अडचण येत आहे. ९ ऑक्टोबरला घेण्यात येणारी सभा ही, अलका टॉकीज चौकात घेण्यास परवानगी देण्यात यावी, अशी विनंती मनसेने पुणे शहर आयुक्तांकडे केली आहे.
मनसेने पोलीस आयुक्तांना अर्ज करत जागेबाबतचा प्रश्न मांडला आहे. निवडणूक काळात प्रचार सभा घेण्यासाठीची मैदाने शासनाकडून संबंधित संस्थांकडून ताब्यात घेत उपलब्ध करून देणे नियमानुसार बंधनकारक असताना शासनाकडून तशी कार्यवाही केली जात नाही. कारण, त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे आणि शहरातील बहुतांश शाळांच्या मैदानांवर भाजप प्रणित संस्थांचे ताबे असल्याने शाळा मैदान देण्यासाठी टाळाटाळ करत शासन आम्हाला मैदान दिल्यास नंतर त्रास देते असे सांगत आहे.
दरम्यान पुण्यात मनसेने 4 उमेदवार दिले आहेत हडपसर – वसंत मोरे, कोथरूड – किशोर शिंदे, कसबा पेठ – अजय शिंदे, कॅन्टोमेंट – मनीषा सरोदे हे उमेदवार मनसेने दिले आहेत.