मुंबईच्या रस्त्यावर तृतीयपंथीयांचा राडा; वाद मिटवायला गेलेल्या पोलिसांवरच उचलला हात; व्हिडीओ सोशलवर व्हायरल

मुंबई :  देशात आजकाल जनतेचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांच्या वर्दीवरचहात घालण्याचे धाडस काही समाजकंटक करत असताना समोर येत आहे. अशीच एक घटना आता समोर अली असून या घटनेत वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर चक्क तृतीयपंथीयांनी हल्ला केला आहे. मुंबईतील मालाडमधील  या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मुंबईतील मालाड परिसरात तृतीयपंथीयांची अरेरावी आणि गुंडगिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शनिवारी दुपारी काही तृतीयपंथीयांनी पोलीस हवालदाराला मारहाण केली. तसेच वाहतूक पोलिसांची कॉलर पकडून धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे.

हे तृतीयपंथी एवढ्यावरच थांबले नाहीतर त्यांनी एका पोलिसांसोबत गैरव्यवहार सुद्धा केला. कपडे काढून या तृतीयपंथीयांनी पोलिसांवर हल्ला केला. या प्रकरणी बांगुर पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात  गुन्हे दाखल केले आहे.

बांगुर नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका दुचाकीचालकाने रिक्षाला धडक दिली होती. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला होता. तिथे उभ्या असलेल्या काही तृतीयपंथीयांनी रिक्षाचालकाची बाजू घेतली आणि दुचाकीस्वाराला मारहाण सुरू केली. पोलिसांनी मध्यस्थी करून वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. पण, तृतीयपंथीयांनी पोलिसांवरच हल्ला केला.

पोलिसांनी तीन तृतीयपंथीयांना अटक केली आहे. पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करणे, जीवे मारण्याची धमकी देणे असे गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.