चिंबळी – परप्रांतीय मजुरांना आपल्या मुळ गावी जाण्यास शासनाने परवागी दिली असली तरी त्यासाठी आरोग्य प्रमाणपत्र (मेडिकल सर्टिफिकेट) गरजेचे आहे. त्यामुळे चाकण औद्योगिक वसाहतीत कम करणारे मजूर कुरुळीत (ता. खेड) वास्तव्याला असून ते आपल्या गावी जाण्यास उत्सुक असल्याने त्यांनी कुरूळी येथील प्राथमिक उपकेंद्रात सकाळपासूनच मोठ्या रांगा लावत आहेत.
दरम्यान, कुरूळी येथे जवळपास 13 हजार भाडेकरू कामानिमित्त बाहेर गावचे आले आहे यासाठी ग्रामपंचायतीच्या व आरोग्य केंद्राच्या परिसरात गर्दी होऊ नये म्हणून पोलीस बदोबंस्त ठेवण्यात आला आहे.