पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ व महाविद्यालयीन परीक्षेसंदर्भात कोणतीच स्पष्टता नाही. त्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व परीक्षांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित केली आहे. पुढील आदेश प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांना याबाबत माहिती कळविण्यात येणार असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने स्पष्ट केले आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा 11 मार्चपासून सुरू झाल्या आहेत. तसेच, एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या काही अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र, करोनामुळे संचारबंदी लागू आहे. सलग तीन टप्प्यात ही संचारबंदी वाढवली. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही परीक्षेसाठी अर्ज सादर करता येऊ शकले नाही. त्याचप्रमाणे आता विद्यापीठ व महाविद्यालयीन
परीक्षा घेण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली आहे. समितीचे कामकाज सुरू आहे.