जामखेड (प्रतिनिधी) – जामखेड शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून अनेक ठिकाणी तिने तीन-चार फुटाचे खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे अपघातात मोठी वाढ सुद्धा झाली आहे. येत्या ४ दिवसात जामखेड शहरातील सर्व खड्डे तात्काळ बाजूवावे अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले यांनी दिला.
“जामखेड शहरामध्ये सर्वच रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडलेले आहेत. दरम्यान, हे खड्डे तीन ते चार फुटाचे असून खड्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघातात होत आहे. नगररोड, बीड रोड, खर्डा रोड, करमाळा रोड, कर्जत या रोडवरील रस्त्यांची अस्वथा अंत्यत दयनीय झाली आहे. त्यामुळे खड्ड्यात रस्ते कि रस्त्यात खड्डे हेच समजत नाही.
शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवर मोजता येणार नाहीत इतके खड्डे पडले आहेत. त्यामुळे तात्काळ रस्ते दुरुस्त करून खड्डे बुजविण्यात यावेत अन्यथा (दि. ११) सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकण्यात येईल” असे निवेदनात म्हटले आहे.