पुणे- परवा झालेल्या जोरदार पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. दरम्यान, विमाननगर परिसरात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी थेट वाहतूक पोलीस सुजित वाघमारे यांनी प्रयत्न केले. सध्या ट्विटरवरुन सुजित वाघमारे आणि वाहतूक शाखेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.