मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्तास्थापनेसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळे शिवसेना चांगलीच विवंचनेत आहे. शरद पवार यांनी आज आम्ही विरोधी पक्षचं सांभाळणार असल्याचे स्पष्ट केले. सत्तेच्या समान वाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये चांगलाच गोंधळ सुरु असून भाजपने मुख्यमंत्री पद सोडणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या मातोश्रीवर शिवसेनेच्या आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. उद्या सकाळी 11.30 वाजता हि बैठक बोलावण्यात आली असून या बैठीकीमध्ये शिवसेना अंतिम निर्णय घेणार असल्याचे बोलल्या जात आहे.