चंदीगड – पंजाब पोलिसांनी सोमवारी पाकिस्तानस्थित दहशतवादी मॉड्युलचा पर्दाफाश करून नवांशहर येथील गुन्हे अन्वेषण एजन्सी कार्यालयावर झालेल्या हातबॉम्ब हल्ला प्रकरणाचा तपास पूर्ण केला आहे. या प्रकरणात तीन संशयीत दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या दहशतवादी गटाचा म्होरक्या हरविंदरसिंग हा आहे.
गेल्या वर्षी 7 आणि 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्री अज्ञातांनी नवांशहर येथील गुन्हा अन्वेषण कार्यालयावर पोलीस अधिकाऱ्यांना मारण्याच्या उद्देशाने हॅंडग्रेनेड फेकले होते. मात्र, कार्यालयात उपस्थित अधिकारी सुखरूप बचावले होते. याप्रकरणी पोलिसांनी ज्या संशयीतांना अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून एक जिवंत हातबॉम्बही जप्त केला आहे.
यातील आरोपींनी गुन्हा कबूल केला असून हरविंदरसिंग याच्या सूचनेवरून हा हल्ला करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्वत: हरविंदरसिंग मात्र अजून फरार आहे.