चंदीगड – पंजाबचे अर्थमंत्री मनप्रित बादल यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. हा एकूण 1 लाख 68 हजार 15 कोटी रूपयांचा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीचा पुढील टप्पा पुर्ण करण्यासाठी एकूण 1186 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
भुमीहीन मजुरांसाठीही 526 कोटी रूपयांची तरतूद यात आहे. राज्यातील वृद्धांना मिळणारी पेन्शन दुप्पट करण्याचा महत्वाचा निर्णयही यात घोषित करण्यात आला असून पंजाबात वृद्धांना आता दरमहा 750 ऐवजी 1500 रूपयांची पेन्शन मिळणार आहे.
शगुन योजनेची रक्कमही प्रत्येकी 21 हजार रूपयांवरून 51 हजार रूपये इतकी करण्यात आली आहे. पंजाबात पुढील वर्षी निवडणुका होणार असून विद्यमान सरकारचे त्यांच्या चालू कार्यकाळाचे हे शेवटचे बजेट आहे.