पुणे -तंबाखूचे आरोग्यावर होणारे दुष्पपरिणाम लक्षात घेऊन तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायद्याबाबत व्यापक स्वरुपात जनजागृती करावी तसेच कायद्याबाबत नियमित प्रशिक्षणावर भर द्यावा. नागरिकांनीही अशा पदार्थांचे सेवन टाळणे गरजेचे आहे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व धूम्रपान करणाऱ्यांकडून दंड वसूल करावाच, करोना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ही कारवाई पोलीस व संबंधित विभागांनी राबवावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समिती सभा गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले.