पुणे – आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचा “कॅंडीडेट मास्टर’ हा किताब मिळवलेले आणि 31 वर्षांहून अधिक काळ बुद्धिबळ प्रशिक्षण देणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच बुद्धिबळ महर्षी जोसेफ डिसुझा यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
शिवछत्रपती पुरस्काराने गौरवले गेलेले महान खेळाडू आणि पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे चेअरमन राहिलेल्या डिसुझा यांनी ग्रॅंडमास्टर अक्षयराज कोरे, कृतिका नाडीग, शशिकांत कुतवळ, राजेश ओझा असे नामांकित बुद्धिबळपटू घडवले आहेत. त्याचबरोबर 300 हून अधिक खेळाडू घडवणे आणि शेकडो स्पर्धांच्या आयोजनात त्यांचा सहभाग होता.