मुंबई- झी मराठीवरील लाडकी मालिका माझा होशील ना सध्या चांगलीच प्रकाशझोतात आहे. अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि विराजस कुलकर्णी ही जोडी कमी काळात प्रचंड लोकप्रिय झाली. या लोकप्रिय जोडीने कोरोनावर मात केली आहे.
या कोरोनाच्या आजारपणाबाबत स्वत: विराजसने माहिती दिली. इंस्टाग्रामवर पोस्ट करत त्याने कोरोनाचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
Hey guys… मागचे १० दिवस २ गोष्टी झाल्या – एक म्हणजे मी social media वरून गायब झालो होतो, आणि दुसरं – तुमच्या सगळ्यांच्या DM आणि comments चा भडिमार होत होता… सगळ्यांना उत्तर देणं शक्य नव्हतं. But as many of you guessed, I was found Covid positive last week (so technically ३ गोष्टी झाल्या) पण tension घ्यायचं काही कारण नाही. जो त्रास व्हायचा होता तो संपलाय, आणि नशिबाने सुट्टीसाठी पुण्याच्या घरीच होतो. दिवाळी मात्र ह्या आजारानं खाल्ली, पण आता पुन्हा shooting साठी सज्ज झालो आहे, आणि आपण TV वरआणि इथे भेटत राहूच. , असं कॅप्शन लिहत त्यांनी कटू अनुभव शेएर केला आहे.
View this post on Instagram