पुणे – सराईत माधव वाघाटे याच्या खूनातील मुख्य आरोपीकडून गुन्हे शाखेच्या युनीट एकने पिस्तूलासह जिंवत काडतुसे जप्त केले. त्याशिवाय एका सराईताकडून कोयते, चॉपर, तलवार असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
सावन सुभाष गवळी (वय 24, रा.बिबवेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तो दोन महिन्यांपुर्वी जामिनावर सुटला होता. सराईत गुन्हेगार माधव वाघाटे याचा खून केल्याप्रकरणी सावन गवळी, आनंद कामठेसह 9 आरोपी अटक आहेत.
जामीनानंतर खूनातील मुख्य आरोपी सावन गवळी बिबवेवाडीत असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेउन पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली.
ही कामगिरी अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक शैलेश संखे, उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, अंमलदार अमोल पवार, अजय थोरात, इम्रान शेख, अय्याज दड्डीकर, सतिश भालेकर, राहुल मखरे, अशोक माने, शशीकांत दरेकर, तुषार माळवदकर, महेश बामगुडे, मीना पिंजन, रुक्साना नदाफ यांनी केली.