पिंपरी, (प्रतिनिधी) – मावळ लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांतता, निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी येत्या 13 मे रोजी मावळ लोकसभा मतदार संघात मतदानाच्या दिवशी भरणारे सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आदेश जारी केले आहेत.
मुंबई मार्केट अॅण्ड फेअर अॅक्ट 1862 चे कलम 5 अन्वये हे आदेश जारी करण्यात आले असून त्यानुसार मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणार्या मावळ तालुक्यातील टाकवे बु. या ठिकाणचा आठवडे बाजार 13 मे रोजी बंद राहणार आहे.
या आदेशाचे कोणत्याही व्यक्तीने उल्लंघन केल्यास मुंबई मार्केट अॅण्ड फेअर अॅक्ट 1862 मधील तरतुदीनुसार दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.