पुणे – पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या वतीने नाना पेठ येथील सुनील घाडगे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि औषध वाटप करण्यात आले. माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या शिबिरामध्ये नागरिकांना कान, नाक, घसा, डोळे, हाडे, आणि बीपी आदीं आजारांबाबत 200 लोकांची मोफत आरोग्य तपासणी व 200 लोकांना मोफत औषध वाटप करण्यात आले.
मोफत शिबिरामध्ये भारती हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सहकार्य केले. शिबिराचे आयोजन काँग्रेस पक्षाचे भवानी ब्लॉग अध्यक्ष सुनील घाडगे आणि काँग्रेस पक्षाचे वार्ड क्रमांक 20 चे अध्यक्ष सुरेखा सुनील गाडगे यांनी केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, माजी नगरसेवक अविनाश बागवे, काँग्रेसचे ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुनील पंडित, प्रा. वाल्मिक जगताप, विठ्ठल थोरात, अरुण गायकवाड, अॅड, रवींद्र माने, अॅड, सचिन परदेशी, सुनील बावकर, विनोद साळवे, परशुराम घाडगे, संजय साठे, सुरेखा खंडागळे, दयानंद आढागळे, विक्की खन्ना, चेतन अगरवाल, सुनील नेटके आदि यावेळी उपस्थित होते