पीएमआरडीएच्या विविध कामांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान ठरतेय सहायभूत
पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) वेगाने विकास होत आहे. त्यासाठी पायाभूत सुविधांचे सर्वेक्षण, प्रकल्पांची आखणी यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. सध्या पीएमआरडीएच्या ताफ्यात आता तीन ड्रोन आहेत. या ड्रोनचा वापर प्रामुख्याने अनधिकृत बांधकामांवर नजर ठेवणे, टीपी स्कीम आखणी, रस्ते सर्वेक्षण व रुंदीकरण आदी कामांचे सर्वेक्षण करण्यासाठी करण्यात येत आहे.
पीएमआरडीएच्या हद्दीत सुमारे 814 गावांचा समावेश होतो. एवढ्या मोठ्या क्षेत्रातील कामांवर नजर ठेवण्याकरीता पीएमआरडीएने ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. सध्या पीएमआरडीएकडे कॉर्स हे अद्ययावत तंत्रज्ञान असलेले ड्रोन आहेत. नगररचना योजनांची (टीपी स्कीम) आखणी व विकास, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प, रिंगरोडचे सर्वेक्षण, रस्ते रुंदीकरण व सुविधा क्षेत्राचे हस्तांतर, अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण यासाठी पीएमआरडीए ड्रोन या नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे.
ड्रोनची वैशिष्ट्ये
* ड्रोनने काढलेल्या छायाचित्रावर अक्षांश व रेखांशचा उल्लेख असणार
* जीआयएस बेस ड्रोन
* या ड्रोनची फ्लाईंग क्षमता 45 मिनिटे असून एकावेळी सुमारे 50 हेक्टर जमिनीवरील सद्यस्थिती समजू शकते.
* कॉर्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याने यामध्ये अचुकता अधिक