सातारा – जिल्ह्यातील पारगाव, खंडाळा, शिरवळ, भुईज, वाई, उंब्रज या भागात के. टी. एम. मोटारसायकलवरून येऊन घरफोड्या करणाऱ्या टोळीचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी पाच जणांना अटक करून तब्बल 103 तोळे सोने, 50 किलो चांदी जप्त केली. सातारा जिल्ह्यातील ही रेकॉर्डब्रेक कामगिरी ठरली. दरम्यान, या टोळीने पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली जिल्हयात तसेच कर्नाटक व गुजरात राज्यातही घरफोड्या केल्या आहेत.
याप्रकरणी सुरदेव सिलोन नानावत (वय 33) व परदुम सिलोन नानावत (वय 25, दोघेही रा. रा. घोटावडे, ता. मुळशी, जि. पुणे), राम धारा बिरात (वय 38, रा. करमोळी, पो. पौड, ता. मुळशी, जि. पुणे), वामन नंदू राठोड (रा. फंडवस्ती रांजणगाव जि. पुणे), वाल्मीक रामभाऊ शेखावत, (रा. पाटस, ता. दौंड, जि. पुणे) या पाचजणांसह त्यांच्याकडून सोने विकत घेणाऱ्या गुजरातमधील महिला सोनार व प्रदीप आसनदास खटवानी या दोन सोनारांना अटक केली आहे. या संशयितांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या टोळीकडून राज्यभरात अनेक ठिकाणी केलेले चोऱ्यांचे आणखी गुन्हे उघडकीस येणार आहेत. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रवींद्र भोरे, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील तसेच कारवाईत सहभागी अंमलदार उपस्थित होते. जिल्ह्यात एकाच वेळी 15 ते 40 ठिकाणी घरफोड्या झाल्याच्या घटना घडल्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (एलसीबी) तपास करताना त्यांना के. टी. एम. दुचाकीवरील टोळीने घरफोड्या केल्याचे समजले. त्यानुसार ते संशयितांचा शोध घेत होते. गेली 3 महिने मागावर असताना पोलीसांना चोरट्यांची माहिती मिळाली आणि उचलबांगडी केली. त्यानुसार संशयितांनी चोऱ्यांची कबुली दिली.
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक राज्यात चोरी केल्याचे तसेच चोरीचे सोने गुजरातमधील सोनार महिलेला विकल्याचे संशयितांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी लाखो रुपयांचे चोरीचे सोने जप्त केले.समीर शेख, आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण देवकर, सुधीर पाटील, रवींद्र भोरे, भुईंजचे सपोनि रमेश गर्जे, विश्वास शिंगाडे, पतंग पाटील, अमित पाटील, अंमलदार तानाजी माने, सुधीर बनकर, विश्वनाथ संकपाळ, अतिष घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, मंगेश महाडिक, शरद बेबले, लैलेश फडतरे, प्रवीण फडतरे, अमोल माने, अजित कर्णे, मुनीर मुल्ला, राकेश खांडके, सनी आवटे, हसन तडवी, अरुण पाटील, शिवाजी भिसे, राजू कांबळे, अर्जुन शिरतोडे, अमित माने, मनोज जाधव, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, ओमकार यादव, विक्रम पिसाळ, मोहन पवार, स्वप्निल दौंड, धिरज महाडिक,
केतन शिंदे, सचिन ससाणे, रोहित निकम, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, संकेत निकम, वैभव सावंत, मोहसीन मोमीन, शिवाजी गुरव, अमृत कर्पे, दलजीत जगदाळे, पंकज बेसके, संभाजी साळुंखे, अंमलदार दीपाली यादव, यश्वदा मोरे, मोनाली निकम, शकुंतला सणस, अधिका वीर, प्रिती पोतेकर, मोनाली पवार, काजल साबळे, अनुराधा सणस, सायबर विभागाचे अमित झेंडे, अजय जाधव, फॉरेन्सिक विभागाचे सपोनि रुपाली मोरे, सपोनि विजय जाधव, गजानन तोडकर, मोहन नाचण, राजीव कुंभार, अमोल जाधव, अनिल खटावकर, अमोल निकम, रुद्रायण राऊत यांनी या कारवाईत सहभाग घेतला.