Heavy vehicles entry ban in Pune | पुण्यात नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे यावर उपाय योजना करण्यात येणार आहे. यासाठी पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पुण्यात उद्या म्हणजे 5 मार्चपासून जड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.
पुणे-नगर, पुणे-सोलापूर, पिंपरी-चिंचवड, पुणे शहर या मुख्य मार्गांवर जड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. पुण्यातून बाहेर पडण्यासाठी जड वाहनांना आता पर्यायी मार्ग वापरावा लागणार आहे.
प्रवेश बंदी असल्याने नियमांचं उल्लंघन केल्यास दंड किंवा कारवाई करण्यात येणार आहेत. पुण्यात आधीच वाहतुकी कोंडीची समस्या असताना सध्या सुरू असलेले मेट्रो आणि उड्डाणपुलाच्या कामामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र या निर्णयामुळे नागरिकांची आता गैरसोय होणार नाही.
पर्यायी मार्ग कोणते? Heavy vehicles entry ban in Pune |
- वाघोली ते पुणे शहराच्या दिशेने जाणाऱ्या जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद राहणार आहे. या मार्गांऐवजी शिक्रापूरहून चाकण मार्गे पिंपरी चिंचवड आणि तळेगाव दाभाडे मार्गे मुंबईकडे तसेच अहमदनगरकडे जड वाहनांना जाता येणार आहे.
- पुणे सोलापूर व पुणे सासवड रोडने येणाऱ्या वाहनांना हडपसर नोबल हॉस्पिटल चौक खराडी बायपास चौकाकडे २४ तास प्रवेश बंद राहील. यासाठी पुणे सोलापूर रोडवरून येणाऱ्या वाहनांनी थेऊर फाटा येथून उजवीकडे वळण घेवून थेऊर, लोणीकंद, शिक्रापूर मार्गे जावे.
- पुणे सासवड रोडवरून येणाऱ्या वाहनांनी हडपसर येथे यु-टर्न घेऊन थेऊर फाटा येथून डावीकडे वळून थेऊर, लोणीकंद, शिक्रापूर मार्गापर्यंत जावे.
- पुणे सोलापूर रोड येथुन सातारा, मुंबई कडे जाणाऱ्या वाहनांनी हडपसर येथुन डावीकडे वळण घेऊन सासवड रोडवरून मंतरवाडी फाटा उजवीकडे वळण घेऊन खडी मशीन चौक ते कात्रज चौक येथून साताराकडे किंवा नवले पुल मार्गे मुंबईकडे जातील.
- तर मुंबईकडून येणारी वाहने नवले पूल ते कात्रज चौकात डावीकडे वळतील आणि साताऱ्याकडून येणारी वाहने कात्रज चौकातून खडी मशिन चौक मंतरवाडी चौकाकडे डावीकडे वळून हडपसरमार्गे सोलापूरच्या दिशेने डावीकडे वळतील आणि मंतरवाडी चौकातून सासवडकडे उजवीकडे वळतील. Heavy vehicles entry ban in Pune |
हेही वाचा:
JP Nadda | जेपी नड्डा यांचा नागपूर दौरा अचानक रद्द; कारणं आले समोर
Yogita And Saorabh Wedding | ‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता आणि सौरभने बांधली लग्नगाठ