JP Nadda Maharashtra | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा नागपूर दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. नागपूर विद्यापीठाजवळ भाजपच्या युवा मोर्च्याच्या राष्ट्रीय नमो युवा संमेलनाचं आज आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी मोठी तयारी देखील करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला आज जेपी नड्डा हजर राहणार होते. मात्र ते आता येथे उपस्थित राहणार नाहीत.
जेपी नड्डा यांच्या जागी आता केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्यांना स्मृती इराणी नमो राष्ट्रीय युवा संमेलनात सहभागी होऊन तरुणांना संबोधित करणार आहेत. आज सोमवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय परिसरात या संमेलनाला आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला राज्यभरातील 1 लाख युवक सहभागी होणार आहेत. परंतु जेपी नड्डा यांनी अचानक दौरा रद्द का केला? यामागचे कारण समोर आले आहे. भाजपच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डची आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर जेपी नड्डा यांचा नागपूर दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे.
अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर JP Nadda Maharashtra |
तर दुसरीकडे अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अमित शाह आज छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि जळगाव दौऱ्यावर आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगर शहरात शाह यांची जाहीर सभा देखील होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
शाह यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
यापूर्वी 2009 मध्ये भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन नागपुरात झाले होते. देशभरातील नेते नागपुरात आले होते. पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकदा भाजपच्या युवा शाखेच्या म्हणजे भाजयुमोचे राष्ट्रीय अधिवेशन नागपुरात होत आहे. मात्र आज होणाऱ्या या कार्यक्रमात जेपी नड्डा उपस्थित राहणार नाहीत. JP Nadda Maharashtra |
हेही वाचा:
अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर; ‘या’ ठिकाणी देणार भेट, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची तयारी सुरू
काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, मंत्री म्हणूनही उत्कृष्ट; तरीही गडकरी ‘यादी’तून कट…