पुणे : गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती हिला धमकी दिल्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी ससून रुग्णालयातून पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मार्शल लुईस लीलाधर असे पसार झालेल्याचे नाव आहे. गुंड मोहोळ याचा 5 जानेवारी रोजी परिसरात गोळ्या झाडून खून करण्यात आला होता.
मोहोळची पत्नी स्वाती हिला समाज माध्यमातून देण्यात आली होती. याबाबत तिने पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी तपास करुन मार्शल ला अटक केली होती. त्याला येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. त्याची तब्येत बरी नसल्याने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मार्शल बंदोबस्त बंदोबस्तवरील पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके नावाने करण्यात आली आहे. अमली पदार्थ तस्कर ललित पाटील ससूनमधून पसार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांना निलंबित करण्यात आले होते.