पुणे – “एसएसपीएमएस’ संस्थेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ स्मारकासमोर उभारणार भगव्या स्वराज्यध्वजासह 51 फूट शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात येणार आहे. शिवजयंती महोत्सव समितीने हा उपक्रम हाती घेतला असून, दि. 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिनी सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
शिवस्वराज्य दिन सोहळ्याचे प्रवर्तक आणि शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी या विषयी माहिती दिली. यावेळी महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, श्रीमंत मालोजीराजे छत्रपती आणि सर्व स्वराज्यघराणी, स्वराज्यबांधव उपस्थित राहणार आहेत.
पुण्यामध्ये दरवर्षी लालमहाल, एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, छत्रपती संभाजी महाराज स्मारक डेक्कन, शनिवारवाडा यांसह अनेक ठिकाणी स्वराज्यगुढी उभारली जाते. यावर्षी देखील एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे स्वराज्यगुढी उभारून पूजन होणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.