पुणे– उन्हाचा चटका आणि ढगाळ वातावरणामुळे गेल्या 24 तासांत शहरातील थंडीचा जोर कमी झाला. तर किमान तापमानातही एक अंशाने वाढ झाली आहे. दिवसाची थंडी कमी झाली असली, तरी शहराच्या उपनगर भागात रात्री थंडी चांगली जाणवत आहे. रविवारी (दि. 31) शहरात किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
दिवसा जाणवणारी थंडी मागील 24 तासांत कमी झाली आहे. त्यात रविवारी दुपारी ऊन पडल्यामुळे नागरिकांना चटका सहन करावा लागला. तसेच अधून-मधून ढगाळ वातावरण होते. शहराच्या काही भागात सकाळी धुके पडले होते. दरम्यान, पुढील दोन दिवस किमान तापमानात एक ते दोन अंशांनी वाढ होईल, तर ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.