ओझर : श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टने नूतनीकरण केलेल्या भोजनगृहाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलताना बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व इतर मान्यवर
ओझर – श्रीक्षेत्र ओझर हे अष्टविनायक तिर्थक्षेत्रांपैकी अत्यंत पवित्र व विकसीत तिर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते येथे येणाऱ्या भक्तांना सुख सुविधा पुरविण्याचे काम देवस्थान ट्रस्ट सातत्याने करत आहे. भाविकांना भोजनाच्या सोईसाठी देवस्थान ट्रस्टने अत्याधुनिक सुखसोयीनी परिपूर्ण असे महाप्रसादालय सुरु केले. महाप्रसादालयाचा लोकार्पण सोहळा संकष्टी चतुर्थीचे मुहूर्तावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला.
लोकार्पण सोहळ्या प्रसंगी बोलताना मंत्रीमहोदयांनी श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे व विश्वस्त मंडळ राबवित असलेल्या विविध कामांचे कौतुक केले. देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे यांनी केलेल्या निवेदनानुसार देवस्थानला पार्किंगसाठी सात कोटी रुपये खर्चांची वाहनतळाची इमारत व नौकाविहासाठीची परवानगी मिळण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे कबूल केले. कार्यक्रमाला भोसरीचे आमदार महेश लांडगे, जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके ,भाजपच्या नेत्या आशाताई बुचके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पांडूरंग पवार, भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाप्रसादालयाच्या नूतनीकरणाचा सोहळा झाला.
सर्व पाहुण्यांचे स्वागत देवस्थानचे सचिव दशरथ मांडे, विश्वस्त बी. व्ही. मांडे, आनंदराव मांडे, किशोर कवडे, गणपतराव कवडे, श्रीराम पंडीत, कैलास मांडे, मंगेश मांडे, विजय घेगडे, राजश्री कवडे, ओझरच्या पहिल्या आदर्श सरपंच अस्मिता कवडे, विद्यमान सरपंच राजश्री तुकाराम कवडे, उपसरपंच विठ्ठल जाधव, तंटामुक्तीचे अध्यक्ष दत्तापाय कवडे, दिलीप कवडे, ग्रामविकासचे अध्यक्ष संतोष मांडे, मंगलमूर्ती पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश मांडे, बलुतेदार संघाचे अध्यक्ष गणपत टेंभेकर, विविध संस्थाचे पदाधिकारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते .