पुुणे : सिंहगड इन्स्टिटयूट ऑफ बिझनेस अडमिनिस्ट्रेशन अँड रिसर्च, कोंढवा (सिबार) येथील एम. बी. ए.च्या पहिल्या व दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी सिंहगड किल्ला येथे सिबार आणि सिंहगड इन्स्टिटयूट कोंढवा कॅम्पस चे प्रा. डॉ. धनंजय मंडलिक यांच्या विशेष मार्गदर्शनातून विविध उपक्रम राबविले.
विद्यार्थ्यांनी सर्व प्रथम सिंहगड किल्ला पायी चढून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेत शिवगर्जना देऊन गडाची स्वछता करत पर्यटकांना स्वच्छता, फिटनेस आणि एकतेचे संदेश दिले.
या उपक्रमासाठी मुलां बरोबरच मुलींचाही सहभाग मोलाचा ठरला. या प्रसंगी ७१ विद्यार्थी आणि प्रा. कौस्तुभ वीरकर व प्रा. क्रितीका उपस्थित होते.