पुणे – राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार शिक्षणाचे बालपणातील काळजी व शिक्षण (पायाभूत स्तर) शालेय शिक्षण, शिक्षक शिक्षण व प्रौढ शिक्षणमधील घटकांचे अवलोकन करून राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची गुणवत्तापूर्ण व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन करण्यात आलेली आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत राष्ट्रीय शिक्षण धोरण – २०२० लागू करण्यात आले आहे. शिक्षण धोरणाची राज्यात अंमलबजावणी टप्याटप्याने सुरू झाली आहे. याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मिती होय, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यांचे अवलोकन करून आवश्यक बदलांसह राज्याच्या दृष्टीने आवश्यक बाबीचा समावेश, शिफारस व मार्गदर्शन तसेच ५+३+३+४ या रचनेतील शैक्षणिक कार्याचे सनियंत्रण आणि सुसूत्रीकरण करण्यासाठी मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली संदर्भीय शासन निर्णयान्वये सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे.
सेवानिवृत्त अतिरीक्त जिल्हाधिकारी अशोक हरीभाऊ मुंडे, बाळासाहेब खर्डेकर कॉलेजचे (तेंगुर्ला) प्राचार्य डॉ. आनंद प्रभाकर बांदेकर, सहाय्यक शिक्षिका सिमरन सचिन सामंत यांचाही सुकाण समितीत सदस्य म्हणून समावेश करण्यात आलेला आहे.