पुणे – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जयंती अभिवादन कृती समिती, पुणे च्या वतीने ७० हजार ४४५ हून अधिक देशी वृक्षांच्या रोपांचे विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे. बुधवार, दि. ३ जानेवारी रोजी महात्मा फुले पेठेतील महात्मा फुले वाडा राष्ट्रीय स्मारक येथे सकाळी १० ते पाच यावेळेत हे अभियान राबवले जाईल.
सावित्रीबाईंच्या जयंतीचे हे १९३ वे वर्ष असून प्रत्येक वर्षीचे ३६५ दिवस याप्रमाणे एकूण ७० हजार ४४५ दिवस पूर्ण होत असून, तेवढी रोपे नागरिकांना देण्यात येणार आहेत. यामध्ये पर्यावरण पूरक देशी वृक्षांचा म्हणजेच तुळस, पिंपळ, वावर, कडुलिंब, बहावा, दिल का राजा, भेंडी ,सिताफळ, उंबर ,आंबट चिंच, वड ,पळस टिकोमा, शिसवी, जांभूळ ,करंजी ,मोगरा आधी वृक्षप्रजातीचा समावेश आहे. याची नावनोंदणी फुले वाडा येथे सुरू होणार आहे.
अभियानाचे आयोजन रघुनाथ ढोले, रवि चौधरी, प्रल्हाद गवळी, सारंग सराफ, बाळासाहेब अमराळे, नंदा पंडीत, एकनाथ ढोले, सुनीता काळे, श्रीधर चव्हाण, चेतन धोत्रे, सचिन विप्र, डॉ. गणेश परदेशी, सुशीला नेटके, बाळासाहेब भामरे, रमेश जाधव, गणेश पाटील, विजय रजपूत यांनी केले आहे. सदर वृक्षांची लागवड आणि देखभाल लोकसेवा शैक्षणिक संस्था समूहाने मौजे फुलगाव तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी केलेली आहे.