पुणे- प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पटणा आणि बनारस या मार्गांवर विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
दिवाळी आणि छट पूजेच्या निमित्ताने उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढत आहे. या अनुषंगाने रेल्वेकडून विशेष फेऱ्यांचे नियोजन केले आहे.
12 नोव्हेंबर रोजी पटणा-पुणे एक्स्प्रेस सुटणार आहे. तर, 14 नोव्हेंबर रोजी पुणे-पटणा एक्स्प्रेस धावणार आहे. ही रेल्वे पुण्याहून सकाळी 5.30 वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता पटणा येथे पोहोचणार आहे. तर, 1 ते 15 नोव्हेंबरदरम्यान पुणे-बनारस एक्स्प्रेस आणि 3 ते 17 नोव्हेंबरदरम्यान बनारस-पुणे एक्स्प्रेस धावणार आहे. या रेल्वे दौंड कॉर्डलाइन, अहमदनगरमार्गे धावणार आहे.
हडपसरहून झाशीसाठी रेल्वे
4 ते 18 नोव्हेंबरदरम्यान हडपसर ते झाशी एक्स्प्रेस धावणार आहे. ही रेल्वे हडपसर येथून दर गुरुवारी दुपारी 3.15 मिनिटांनी सुटणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी 9.35 वाजता झाशी येथे पोहोचणार आहे. तर 3 ते 17 नोव्हेंबरदरम्यान झाशी-हडपसर एक्स्प्रेस धावणार आहे. ही रेल्वे दर बुधवारी झाशी येथून दुपारी 12.50 वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी 3.35 वाजता झाशी येथे पोहोचेल.