वाघोली – हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) अध्यक्षपदी संदीप माणिकराव गोते यांची निवड झाली असून त्यांना निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. शिरसवडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच संदीप माणिकराव गोते यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
राजकीय, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील अनुभव व कार्यकर्त्यांचे संघटन याची पार्श्वभूमी पाहून पुणे जिल्हा (pune dist) अध्यक्ष तथा माजी आमदार जगन्नाथ शेवाळे (jagannath shewale) यांच्या उपस्थितीत त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक माणिकराव गोते, अंकुशराव काकडे, प्रशांत जगताप, प्रकाश म्हस्के, विजयराव कोलते,तसेच सहकार राजकीय, सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर यांनी संदीप गोते यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
देशाचे नेते शरदचंद्रजी पवार, खासदार सुप्रिया सुळे,अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना मजबूत करण्यासाठी कार्य करणार असल्याचे संदीप गोते यांनी यावेळी सांगितले.