पुणे- ग्रामीण भागातील धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे येत्या गुरुवारपासून (दि.7) उघडण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहे.
प्रार्थनास्थळांत प्रवेश करतेवेळी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स आदी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच 65 वर्षांवरील नागरिक, अन्य आजारांनी ग्रस्त व्यक्ती, गर्भवती व 10 वर्षांखालील मुलांना प्रवेश नसल्याचे जिल्हा प्रशासनाने आदेशात म्हटले आहे.
- धार्मिकस्थळी या सुविधा पुरवा
- प्रवेशद्वारावर हात स्वच्छ करण्याची व्यवस्था, थर्मल स्क्रिनिंग करणात यावे.
- करोनाची लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा.
- भाविकांना टप्प्याटप्प्याने प्रवेश द्यावा.
- प्रार्थनास्थळ आवारात दुकाने, स्टॉल्स येथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
- भाविकांनी रांगेत उभे राहण्यासाठी
- प्रत्येक सहा फुटांवर मार्किंग करण्यात यावे
- निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
- प्रतिबंधक उपाययोजना
- दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचे अंतर
- मास्कचा वापर अनिवार्य
- सॅनिटायझरचा वापर करणे
- नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
- आरोग्य सेतू ऍपचा वापर करण्यात यावा