पुणे : महिला दिनी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करताना मान्यवर.
पुणे – जागतिक महिला दिनी पुणे पीपल्स को-ऑप. बँकेने पुणे शहर, ठाणे व बेळगांव येथील २० शाखांमध्ये दुपारी ४ ते ६ या वेळेत बँकेच्या सभासद, खातेदार यासह उल्लेखनीय कामगिरी करणा-या महिलांचा सन्मान करण्यात आला. बँकेतर्फे महिलांची साधारण ५०० आर. डी. (रिकरिंग डिपॉझिट) खाती उघडण्यात आली. प्रत्येक शाखेत महिला सदस्यांच्या हस्ते केक कापण्यात आला, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सी.ए. जनार्दन रणदिवे आणि बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष अॅड सुभाष मोहिते यांनी दिली.
यावेळी आरती कोलते, वंदन रासकर, वैशाली बनकर, अश्विनी चिंचवडे, प्रभावती मातळे, सुमन पठारे, प्रभावती भूमकर, योगिनी पोकळे, तेजस्वनी पारखी, श्रुती कोतवाल, मोनिका मुरकुटे, अॅड दीपा कदम, पल्लवी पाटोळे, डॉ. माधुरी अभ्यंकर, शीतल बाळासाहेब अमराळे, अदिती लोयरे, सोनाली तोंडे, मोनिका मुरलीधर मोहोळ, अक्षया विधाते, सुनीता निजामपूरकरसह आदी उपस्थित होते.