Devendra Fadanvis on Shiv Sena Uddhav Thackeray । माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जाहीर सभेत ‘हे तिघे म्हणजे निर्लज्जं सदासुखी’ असं म्हणत टीका केली. उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच धाराशिव येथील सभेत महायुतीवर आरोप केले. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुकोबांचा अभंग वाचून त्याचा अर्थ सांगत उद्धव ठाकरेंवर त्यांच्या खास स्टाईलमध्ये टोला लगावला आहे.
Devendra Fadanvis on Shiv Sena Uddhav Thackeray । नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
‘जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या नावे हे नाट्यगृह सुरु होतं आहे ही एक प्रकारे त्यांना देण्यात आलेली सांस्कृतिक वंदना आहे. तुकाराम महाराजांचे अभंग सदैव प्रेरणा देणारे आहेत. ते असं म्हणतात, ‘गाढवाचे अंगी चंदनाची उटी, राखेसवे भेटी केली तणे..’ म्हणजे गाढवाला जर चंदनाची उटी लावली तरीही तो उकिरड्यात जाऊनच राख अंगाला लावून घेणारच. मी कोणाबद्दल बोलतो आहे ते तु्म्हाला माहीत आहे त्यामुळे फार सांगण्याची आवश्यकता नाही. कारण सध्याचा राजकीय धुरळा उडाला आहे. या धुरळ्यात कोण आपल्या अंगाला राख लावून घेतं आहे हे वेगळ्या प्रकारे सांगायची आवश्यकता नाही. पण मला आनंद आहे की तुकाराम महाराजांच्या नावाने अत्यंत सुंदर असं नाट्यगृह उभं राहिलं आहे.’
दरम्यान, पिंपरी चिंचवडचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून शहरात विविध विकासकामांचे उद्धाटन करण्यात आलं. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी राज्यातल्या शहरांच्या विकासाची दिशा कशी आहे याची माहिती दिली.
हे वाचाल का