मंचर, (प्रतिनिधी) – अध्यात्मिक व वारकरी आघाडी आणि स्वप्निल फाउंडेशन काठापूर बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीनिमित्त व जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्रातील शिवचरित्रावर कीर्तन करणारे कीर्तनकार व शिवचरित्रकार यांचा निरगुडसर ता. आंबेगाव येथे सन्मान करण्यात आला.
निरगुडसर येथील बेटवस्ती येथे हा सन्मान सोहळा पार पडला. महाराष्ट्रातले अनेक कीर्तनकार या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन गोरक्षनाथ टाव्हरे व रामदास करंडे यांनी केले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, नामदेव महाराज वाळके, दत्तात्रय महाराज रुकारी, जालिंदर महाराज करंडे,
बारीकराव महाराज गायकर, सरपंच रवींद्र वळसे पाटील, अशोक करंडे, गोरक्षनाथ टाव्हरे, रामदास करंडे हे उपस्थित होते. मोहनानंद महाराज पुरंदवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अर्चना करंडे व नीलिमा वळसे पाटील यांनी सूत्रसंचालन केले. माजी उपसरपंच विशाल करंडे यांनी आभार मानले.