नारायणगाव, (वार्ताहर) – रोटरी क्लब नारायणगाव हायवेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 20 कृषी महिलांचा सन्मान केला. नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाचे कृषी विज्ञान केंद्राने नैसर्गिक शेतीचा प्रचार व प्रसार प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. प्रशिक्षणाचा समारोप जिल्ह्यातील संगीता गभाले, प्रतीक्षा शिंदे अलका डुंबरे, वृषाली पवार, उज्ज्वला एरंडे,
स्वाती दुराफे, योगिता रोकडे, राजश्री डोंगरे, अनिता गायकवाड ,उज्ज्वला घाडगे ,प्रियंका काळाने, सुप्रिया बार्वे, वंदना भोसले, कुसुम गभाले, नंदिनी आरोटे, गीता करवंदे, मोनिका कांबळे, ज्योती खिलारी, शुभांगी आतकरी आणि मंगल लोले कृषी महिलांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला, अशी माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष रवींद्र वाजगे यांनी दिली. अरुण गाडेकर, रवींद्र वाजगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत निवड केलेल्या कृषी सखींना कृषी विज्ञान केंद्रा मार्फत नैसर्गिक शेतीचा अवलंब व वापर याविषयीचे पाच दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी डॉ. पंजाबराव कथे यांनी महिलांना स्वतःचे आरोग्य व सामाजिक आरोग्या विषयी माहिती दिली. कार्यक्रमास अॅड. राम भालेराव, रामभाऊ सातपुते, नितीन भुजबळ, नारायण आरोटे, अंबादास वामन, धनंजय बोरकर उपस्थित होते. प्रास्ताविक सचिव योगेश यादव, सूत्रसंचालन बाळासाहेब गिलबिले यांनी तर प्रा. डॉ.श्रीकांत फुलसुंदर यांनी आभार मानले.