पुणे – शहरात गेल्या काही वर्षांत मुलींच्या जन्माचे प्रमाण लक्षणीय घटल्याचे समोर आले आहे. काही वर्षांपूर्वीच राज्यात स्त्री-पुरूष जन्मदराच्या गुणोत्तरात राज्यात पहिल्या क्रमांकाचे शहर असलेल्या पुण्यात २०२० मध्ये मुलींच्या जन्मदराचे प्रमाण ९४६ पर्यंत गेले होते. हे प्रमाण गेल्या तीन वर्षात कमालीचे घटले असून २०२३ मध्ये हे प्रमाण ८७७ पर्यंत खाली आहे.
पुणे मनपा अथवा कोणत्याही शहर, जिल्ह्यातून एक हजार मुलांच्या जन्मामागे मुलींच्या जन्माची आकडेवारी उपलब्ध झाल्यास त्यावरून लिंग गुणोत्तर निश्चित केले जाते. जन्म विभागाकडे दैनंदिन मुला-मुलींच्या जन्माची नोंदणी केली जाते. त्यातून संकलित माहितीच्या आधारे हे प्रमाण काढले जाते. लिंग गुणोत्तराच्या बाबतीत पुणे शहर आणि महापालिका क्षेत्र राज्यात वरच्या स्थानावर होते. दरम्यनच्या काळात रुग्णालयांची तपासणी, जनजागृती. लिंगनिदान कायद्याची कडक अंमलबजावणी सुरू केल्याने मुलींचा जन्मदर वाढला होता. आता पुन्हा शहरात मुलींच्या जन्मदरात घसरण सुरू झाली आहे.
सक्षम अधिकार्यांची गरज ?
मनपाा आरोग्य विभागाकडून शहरातील मुलींच्या जन्मदर वाढविण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात, त्यात प्रामुख्याने अनधिकृत गर्भपात रोखणे, गर्भलिंग निदान रोखण्यासाठी हाॅस्पिटल, सोनोग्राफी केंद्रांची तपासणी, गर्भवतींची जनजागृती, कारवाई अपेक्षित आहे. त्यासाठी या विभागास अधिकारी नेमणे आवश्यक आहे. मात्र, आरोग्य विभागात सातत्याने अधिकारी बदलले जातात. त्याचा परिणाम जनजागृती आणि मुलींच्या जन्मावर होत आहे.
* कालावधी आणि जन्मदर
जानेवारी ते नोव्हेंबर २०२३
मुले : २४,८१३
मुली : २२, १२२
वर्ष आणि मुलींचे जन्मप्रमाण
२०१० : ८७९
२०१५ : ९२५
२०२० : ९४६
२०२३ : ८७७
Remarks :
पुणे